चित्रात रंगले होते अवघे रंग तुझिया स्पर्शाने
फूल उमलले होते पिवळ्या सोनसकाळी हर्षाने
पूर्वेकडुनी धावत होती लक्ष लक्ष किरणांची स्वारी
घेउन अपुल्या संगे छाया कोवळी तरतरीत न्यारी
फूल फूल हासले होते त्या छायेच्या अंगाने

किती रंगांची जमली मैफल वसुंधरेच्या ठायी
हिरव्या पिवळ्या पदरावरती काठ मोरपिशी वाही
केशर हलके मिसळून जाई बुट्ट्यांमधुनी नवख्याने

निळ्या किनारी करडा दगडी घाट सजवला होता
तीवर हिरवा गार गालिचा सुबक ठेवला होता
नाव नेटकी उभी पाहिली नदीकिनारी डौलाने

खेळत होती लाट लाट हळुवार किनाऱ्यावरती
तुषार उडवत अल्लड अल्लड नाजुक पायांवरती
रांगोळीही क्षितिजावरती रंगवलेली कुंकवाने

---------- आदित्य देवधर

No comments:
Post a Comment