आनंदाचा एक प्रवासी
पंख लावुनी रोज मनाला
फिरुन येतो कवटाळुनिया
अपुल्या इवल्या आभाळाला
पंख लावुनी रोज मनाला
फिरुन येतो कवटाळुनिया
अपुल्या इवल्या आभाळाला
पावसातुनी कधी सुगंधी
दरवळतो मृद्गंध होऊनी
कधी होउनी नाव कागदी
अलगद येतो भेटायला
खेळ खेळतो किना-यावरी
कधी होउनी अल्लड लाटा
आणिक वाळूमध्ये ओल्या
ठेऊन जातो अस्तित्वाला
कधी होऊनी नात्यामधला
हात कुणाऱ्या हातामधला
ज्योत लावतो मैत्रेयाची
प्रत्येकाच्या दिव्या दिव्याला
पुसल्या असतील जरी अताशा
हातावरल्या काही रेषा
हातावरल्या काही रेषा
तिथे नव्याने चित्र काढतो
पुन्हा भेटण्या नव्या जगाला
पुन्हा भेटण्या नव्या जगाला
