कुठे एवढे वाईट वाटुन घ्यावे म्हणतो
झाले गेले सारे सोडुन द्यावे म्हणतो
काय साधले हिशोब सारे चोख ठेवुनी ?
शून्य तेवढे मागे सोडुन जावे म्हणतो
शून्य तेवढे मागे सोडुन जावे म्हणतो
आरसा तरी किती खरा मानावा , तो ही
डाव्याला उजवे, उजव्याला डावे म्हणतो
डाव्याला उजवे, उजव्याला डावे म्हणतो
शब्दांची कुठलीही गर्दी नकोच आता,
मौनाचे गाणे कुठलेसे गावे म्हणतो
मौनाचे गाणे कुठलेसे गावे म्हणतो
क्षितिजाच्याही पलिकडले मी गाव पाहिले
ते स्वप्नाचे दार मिटोनी घ्यावे म्हणतो
ते स्वप्नाचे दार मिटोनी घ्यावे म्हणतो
नको वाहणे त्याच त्याच तीरांच्या मधुनी
नदी सोडुनी दर्यासागर व्हावे म्हणतो
नदी सोडुनी दर्यासागर व्हावे म्हणतो
लाटांसोबत परतुनिया मी जाता जाता,
शिंपल्यामधे मोती ठेवुन जावे म्हणतो
शिंपल्यामधे मोती ठेवुन जावे म्हणतो
आदित्य

No comments:
Post a Comment