Pages

Monday, September 14, 2026

मी किनारी राहतो

 वाहते चैतन्य गंगा, मी किनारी राहतो 
ओंजळी श्रद्धा कुठेशी लाभते का पाहतो

कर्म नेते ओढुनी मजला जुन्याशा देवळाशी 
मी तिथे गाभ्यातला मग देव होऊन राहतो

कोणती तक्रार नाही की कुठे हुंकार नाही 
तेवढा अंधार होता एक पणती लावतो

लागती कित्येक येथे रोज दीपक चंदनाचे 
मी तरी वेड्याप्रमाणे चंद्र लाघव शोधतो

सोहळे घडतात येथे, आरत्या होतात येथे,
पंगती उठतात किंतू मी उपाशी राहतो

No comments: