खोल दडलेल्या प्रतापी सागराला जाण आता
घेतलेल्या हुंदक्यांची वादळे तू आण आता
ओढ प्रत्यंचा मनाची गर्जुदे आवाज त्याचा
थांबले आहेत भात्यातील सारे बाण आता
पेटवोनी दे मशाली तेल घालुन आसवांचे
जाळ अंधारास आणिक सूर्य पुन्हा आण आता
प्राक्तनाला ठेव तारण, निग्रहाचे लाव तोरण
मनगटाशी तारकांचे बांधुनी संधान आता
---आदित्य
No comments:
Post a Comment