दुपारची शांतता काय सांगते बरे
मिटोनिया पापण्या शांत झोप तू बरे
रुसेल का पाहुनी टीम लीड चावरा
बगांस मी झेलुनी रोज काम आवरे
समोरचा लैपटॉप नको आज वाटतो
फितूर या पापण्या आज काम फार रे
कसाबसा संपला कोड रिव्ह्यू आजचा
उठोनिया पेंगुनी मी मलाच सावरे
लगाम मी घातला घोरण्यास चोरटा
नको नको सांगती श्वास होत घाबरे
कधीतरी येत जाग डोकवून आतुनी
इथेतिथे पाहती लपून नयन बावरे
भिऊ नको तू उगा कोण काय बोलती
जळोनिया आतुनी हे तुझे कलीग रे
करोनिया बाजुला डॉक्यूमेंट फालतू
मिटोनिया पापण्या शांत झोप तू बरे
जमावया लागता झोप डोळीयांवरी
झुकोनिया डेस्कवरी मस्त झोपतो बरे
-------- आदित्य देवधर
Wednesday, March 3, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment