आरशामध्ये मजला दिसलो मी अन् तू ही
एकटाच मग अपुला हसलो मी अन् तू ही
रोजरोजच्या रडगाण्याना बळेच चाली
लावत जाता हसलो रडलो मी अन् तू ही
एकटे कधी वाटे हृदयी, डोळे मिटता
चेहरा तुझा पाहून फसलो मी अन् तू ही
सावली कधी पळून जाता क्षितिजावरती
सावली तुझी होऊन बसलो मी अन् तू ही
पाठीशी हा उभा तुझ्या मी अन् तू माझ्या
तसे एकटे पुरून उरलो मी अन् तू ही
आता मजला तुझियावाचुन करमत नाही
दर्पणातले नाते झालो मी अन् तू ही
---- आदित्य देवधर
एकटाच मग अपुला हसलो मी अन् तू ही
रोजरोजच्या रडगाण्याना बळेच चाली
लावत जाता हसलो रडलो मी अन् तू ही
एकटे कधी वाटे हृदयी, डोळे मिटता
चेहरा तुझा पाहून फसलो मी अन् तू ही
सावली कधी पळून जाता क्षितिजावरती
सावली तुझी होऊन बसलो मी अन् तू ही
पाठीशी हा उभा तुझ्या मी अन् तू माझ्या
तसे एकटे पुरून उरलो मी अन् तू ही
आता मजला तुझियावाचुन करमत नाही
दर्पणातले नाते झालो मी अन् तू ही
---- आदित्य देवधर
No comments:
Post a Comment