केवढी वर्षे उडाली
आज ते कळते पुन्हा
मी कधी चैतन्य होतो
आज मी झालो जुना
आठवोनी सांग मजला
मी नवा होतो कधी
की नवा नव्हतो कधी
अन जन्मलो ऐसा जुना
देवही मजला म्हणाला
'रे भल्या झिजला कसा तू
शेकडो शतके उलटली
मी कधी झालो जुना ?'
कोण पाटी अनुभवाची
कोण येऊन घालतील मज
हार मळका अन जुना
हे जुने सोने म्हणोनी
मी आता हसतो स्वत:शी
मिरवतो मोठे नव्याने
मी जरी झालो जुना
------ आदित्य देवधर
No comments:
Post a Comment