भावनांना जिंकण्याची वल्गना करता कशाला
दोन डोळ्यांतील पाणी लपवुनी फ़िरता कशाला
केवढी नाजूक नाती बांधुनी असतात धागे
उसवुनी मुद्दाम त्यांना फसवुनी शिवता कशाला
चमकणारे चेहरे लेउन रात्री रोज ऐसे
मुखवट्या आडून सूर्याच्या पुढे लपता कशाला
अर्थ सारा संपल्यावर शब्द ना उरतोच तेथे
कागदावर फक्त शाई एवढे उरता कशाला
ठेंगणे कर्तृत्व सारे अंध नशिबाच्या समोरी
आंधळ्याने आंधळी वहिवाट मग धरता कशाला
---आदित्य
No comments:
Post a Comment