Friday, October 15, 2010
बघ तुला भेटायला कोण कोण आलय
बघ तुला भेटायला कोण कोण आलय
चेह-यावरचं सूत अगदी मऊ मऊ झालय
फक्त एवढे जाता जाता घेउन जा तू
हास्य बापुडे केविलवाणे रडून आलय
उगीच दिसती अनोळखी चेहरे कितीसे
हिशेब सारे आता चुकते करून झालय
इथे येउनी पहा जरासे सभोवताली
आनंदाच्या वाटेवर अश्रूंचे आलय
चिंब केवढे ह्रदय दाटले तुझे अचानक
अशा कोणत्या आठवणीच्या तृषेत न्हालय?
कोप-यातुनी उभी एकटी तिला पाहुनी
ऊर भरोनी काळजीतुनी उगाच भ्यालय!
आज शेवटी गुदमरलो मी फुलात राहून
कधी एकदा सरणावरती जातो, झालय.
-------आदित्य देवधर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment