Pages

Tuesday, March 15, 2011

असेन मी ..

नसेन मी तुझ्यासवे
तरी तुला जपेन मी
तुझेच गीत होऊनी,
सुरांतुनी दिसेन मी.

मोहरेल अंग अंग,
येत सोहळा वसंत
रंग रंगुनी नवे
कळी कळी फुलेन मी

कृष्णकांत येत मेघ,
तहानली धरा भिजेल
थेंब थेंब होऊनी
उरातुनी झरेन मी

बीज एक अंकुरेल,
पालवी नवी फुटेल
स्पर्श कोवळे करून,
कोवळे हसेन मी

शेवटी उरेल काय,
श्वासही उडून जाय
सूर्य होऊनी स्वत:
तुझ्या तिथे असेन मी

इथे न मी, तिथे न मी
तरी तुला बघेन मी
शोधसी असा मला
कधी तुला कळेन मी?

---- आदित्य देवधर

2 comments:

Dinesh Wadekar said...

Wah...Khup sundar...keep it up

Aditya said...

Dhanyawaad!!