डोळ्यांदेखत मनास चोरून नेले पुरते
हृदय आजच्या इतके गाफिल कधीच नव्हते
ठोका चुकला तेव्हा कळले धोका झाला
कटात हृदयाचे धडधडणे सामील होते
रोज स्वत:ला समजावून मी सांगत असतो
रोज नेमकी नजर तिच्या नजरेशी भिडते
कसे कळेना हुरहुर वाटे हवी हवीशी
कसे कळेना तिचेच हसणे स्वप्नी दिसते
--आदित्य
No comments:
Post a Comment